मूळ शिक्षण मातृभाषेतून हवे की इंग्रजीतून??
शिक्षण हे आपल्या विचारांना दिशा देण्याचे काम करते. जसं आपल्या मनातील खर्याखुर्या भावना आपण आपल्या आई जवळच मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो, त्यात जर दुसऱ्या कुणाला तरी आई मानून तेवढ्या मुक्तपणे नाही करू शकत. फक्त इंग्रजी बोलणारा पोपट बनून दिशाहीन विचार करणारा आणि काम करणारा रोबोट बनण्यापेक्षा मेंदूला जर सर्वगुणसंपन्न बनवायचे असेल तर मातृभाषे शिवाय पर्याय नाही. इंग्रजी भाषा आपल्यासाठी केवळ शिक्षणाचे माध्यम आहे. तिला जर आपली जीवन शैली बनवून टाकली तर माणूस संकुचित वृत्तीने विचार करायला लागतो हे वास्तव आहे. इंग्रजी भाषेचा अभ्यास जरूर करावा कारण इंग्रजी भाषा ही जागतिक संवादाचे माध्यम बनले आहे.परंतु ती आपली जीवनशैली बनवू नये. म्हणून आपल्या शिक्षणाचा मूळ गाभा मातृभाषेतूनच असायला पाहिजे, आणि त्यानंतर इंग्रजी भाषेचा विचार व्हावा असे मला वाटते. परंतु आता सर्व उलट्या उलट क्रमाने घडत आहे, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.